Press "Enter" to skip to content

कामाचे पैसे मागितले म्हणून पिस्तुल रोखले : आरोपी अटकेत

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

केलेल्या कामाचे पैसे मागितल्यावर पैसे मिळण्या ऐवजी अंगावर पिस्तुल रोखून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तालुक्यात शिळफाटा येथे घडला असून पोलीसानी पिस्तुल रोखणारा आयाज ताजुद्दीन शेख (रा.शिळफाटा खोपोली ) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादि समीर जमीर शेख (रा.इंदिरानगर ,खालची खोपोली) आणि त्याचा मिञ शंकर वाडेकर याना आयाज शेख याने ढेकू येथील सिलेंडर कारखान्यात कामाला लावले होते.सहा दिवस काम केल्यानंतर दोघानाहि कामावरून कमी करण्यात आले.त्यामुळे काम केलेल्या दिवसाचे वेतन मिळावे यासाठी ठेकेदाराकडे मागणी केली.परंतु हजार रूपये देत त्यांची ठेकेदाराने बोलवण केली.अखेरिस समीर व शंकर आयाज शेख याच्या खोपोली शिळफाटा कार्यालयात पगाराचे पैसे मागण्यासाठी गेले.त्यावेळी आयाजने टेबलच्या खणातून पिस्तुल काढून त्यात दुस-या खणातून काढलेली  गोळी भरली.पिस्तुल शंकर आणि समीरवर रोखत दोघाना ठार मारण्याची धमकी आयाज शेखने दिल्यावर दोघहि घाबरून पळून गेले.

घडलेला प्रकार समीरने चुलत भाऊ मोहसीन शेख याला सांगितला.मोहसीन याने समीरला घेवून खोपोली पोलीस ठाणे गाठत आयाज शेख विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलीसानी गुन्हा दाखल करित आयाज शेखला अटक केली आहे.आयाजला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.

याबाबत पुढील तपास पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सतीश अस्वर हे करित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.