सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
सरकारच्या कृषी व कामगार कायद्या विरोधात देशभरात आंदोलन होत आहेत, त्याचा भाग म्हणुन दिल्ली येथे शेतक-यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज कर्जत कडकडीत बंद होते.

या बंदला कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस, कर्जत तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला होता. तर कर्जत व्यापारी फेडरेशनने बंद चे आवाहन केले होते. औषधांची दुकाने, दुग्धालये सुरू होती. शाळा तसेच बँका सुरू होत्या. बाकी सर्व दुकाने बंद होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









Be First to Comment