नितीमत्तेने काम करण्यास आई सोमजाई आम्हाला बळ दे – खा. सुनील तटकरेच साकडं
श्रीवर्धन नगरपालिका क वर्ग दर्जा बदलून ब वर्ग करणार – ना आदितीताई तटकरे
श्रीवर्धन वाशियांच्या ऋणातून मुक्त होऊच शकत नाही – आमदार अनिकेतभाई तटकरे
सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । विजय गिरी ।
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सोमजाई मंदिर जीर्णोद्धार व भक्तनिवास साठी पाच कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आई सोमजाई देवीच्या जीर्णोद्धारसाठी लागणारा निधी आणून काम पूर्णत्वास नेईपर्यंत आई सोमजाई देवी आम्हास नितीमत्तेने काम करण्यासाठी बळ दे अशी प्रार्थना खा. सुनील तटकरे यांनी व्यासपीठावर केली. सोमजाई देवी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी सोमजाई देवीच्या प्रांगणात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष तथा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र सातनाक, विश्वस्त शैलेश खापणकर, नरेश बोरकर, अनिल खडके, अजित मपुस्कर उप नगराध्यक्ष यशवंत चौलकर, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमजाई मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहिल्याचा खूप समाधान यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला. देवीच्या मंदिराचा परिसर विकसित करण कोणा एकाच काम नाही आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. १९९२ साल पासून श्रीवर्धनच आणि माझ जवळच नात आहे. 2009 साली श्रीवर्धन मतदार संघाचा पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्य सरकार मध्ये अर्थमंत्री बनवून तिजोरीच्या चाव्याच हातात दिल्याने श्रीवर्धन चा चेहरा मोहरा बदलला,पुर्ण पणाने बदलला मी म्हणणार नाही. तेव्हापासून अनेकवेळा अनेकजणांना आई सोमजाई मंदिर जीर्णोद्धार करण्यात बाबत सूचना केल्या होत्या. आता आदिती महाविकास आघाडीत मंत्री आसताना हे काम होतंय याच मला खूप आनंद वाटत आहे.

गेल्यावर्षी याच महिन्यात वैचारिक विचार मंथन झालं महा विकास आघाडी सरकार आलं आणि दुर्दैवाने कोविडने थैमान घातला. ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला कंबर कसावी लागली. आता त्याचा प्रादुर्भाव कमी होत असताना विकास कामांवर जोर देण्याच्या उद्देशाने काम सुरू करण्यात आलं आहे. मी नगरविकास मंत्री आसताना क वर्ग नगरपालिकेच दुःख मला कळलं नगरपालिकेच जितकं उत्पन्न आहे तितकंच खर्च करण्याची क्षमता पालिकेकडे होती. त्यावेळी विकास करण्याच्या उद्देशाने अनुदान देण्यात यावे अशी नगरविकास खात्याचा मंत्री आसताना सरकारकडे मी मागणी केली.
३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आलं हवामान खात्याचा अंदाज नेहमी चुकीचा असायचा त्या प्रमाणे निसर्ग चक्रीवादळा चा देखील अंदाज चुकीचा होवो अशी प्रार्थना आम्ही करत होतो. यावेळी मुंबई आणि गुजरात वाचलं आणि पाच पन्नास वर्षाची पुण्याई एक तासात नष्ट झाली एक जीवघेण्या परिस्थितीतुन आपण बाहेर पडलो. डोळ्यातील अश्रू अनावर झाले मात्र श्रीवर्धनच गतवैभव पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुनरप्रस्थापित करण्यासाठी भरीव मदत निधी मंजूर केला. मदतनिधी पासून कोणी वंचित राहिली असेल त्यांनी यादी माझ्याकडे पाठवावी खरंच कोणी पात्र असतील त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून दिली जाईल.
पवार साहेबानी माझ्या हातात राज्याच्या तिजोरोच्या चाव्या दिल्या तेव्हापासून राज्याच्या तिजोरीत काय ठेवलं आहे कुठल्या खणात काय आहे मला चांगलं ज्ञात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून कस काय घ्यावं त्यात काही अडल तर अजितदादा कडून कस सोडवायच मला चांगलं माहिती आहे असे वक्तव्य यावेळी खा. सुनील तटकरे यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या विरोधी पक्षाच्या नेत्या मीना वैश्विकर याना आघाडीच्या मेम्बर अस म्हणत मी आघाडीत आहे. त्यामुळे याठिकाणी देखील आपण एकत्र असल्याचं लक्षात आसुद्या असे म्हणाले .

यावेळी पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी आपल्या वक्तव्यात नूतनीकरण व्हावं तमाम श्रीवर्धन करांची इच्छा होती. जितका आनंदाचा दिवस श्रीवर्धन मधील नागरिकांसाठी आहे तितकाच आनंदाचा दिवस तटकरे कुटुंबासाठी आहे. श्रीवर्धन वासीयांनी आज श्री सोमजाई देवीचे चित्र दिले ही आमच्यासाठी अमूल्य भेट आहे. श्रीवर्धन नगरपालिकेचा क वर्ग चा दर्जा आहे तो ब वर्ग दर्जा करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून जास्त निधी पर्यटनाच्या माध्यमातून आणता येईल असा मानस असल्याचे ना. आदिती तटकरे यांनी सांगितले. नगरपालिकेला स्वछ नगरपालिका राज्यातील प्रथम पुरस्कार मिळावा याचा प्रयत्न आहे. जवणेकरून श्रीवर्धन ला जास्तीत जास्त पर्यटक येतील व सोमजाई मातेचा आशीवाद घेतल्या शिवाय जाणार नाहीत. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या वर्ष पूर्तीचा कार्यक्रम झाला आणि दोन दिवसांनी सोमजाई मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम होतोय खूप समाधान होत असल्याचं सांगत आदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केला.

आमदार अनिकेतभाई तटकरे – यांनी बोलताना श्रीवर्धन तालुक्यात सर्व धर्म समभाव किती खोलवर रुतला आहे. हे याठिकाणी उपस्थित मुस्लिम समाज बांधव याना पाहून दिसत आहे, आई सोमजाई चरणी नतमस्तक साकडं घातल्या शिवाय काही होत नाही. आम्ही साकडं घातलं म्हणून आज हा दिवस दिसत आहे. श्रीवर्धन वाशियांच्या ऋणातून मुक्त होऊच शकत नाही असे सांगितले.








Be First to Comment