सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच अग्रस्थानी ठेऊन जनहिताची त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक कामे करताना जो काही आनंद प्राप्त होतो त्यात जे काही मनाला समाधान मिळते तेच खरे आपल्या प्रत्येक यशमागचे द्योतक असते त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या अगदी जवळच्या अथवा पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा साजेसा सन्मान करून आपलेपणाची वागणूक देण्यात नगरपरिषदेचे गटनेते, शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांचानेहमीच हातखंडा राहिलेला आहे.
त्यामुळेच आज त्यांनी जी युवा कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे हे त्याचेच एक गमक आहे. निवडणूक काळात तर सर्वच पक्षाची मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना गोंजारत असतात परंतु अगोदर पासून तळागाळातील कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची कला ही केवळ प्रसाद सावंत यांना अभिप्रेत आहे त्यामुळे त्यांनी इथला प्रत्येक प्रभागातील युवा कार्यकर्ता पक्ष्याशी एकसंध ठेवला आहे.
पक्षात सर्वच जाती धर्माचे कार्यकर्ते जमा करणे ही एकप्रकारे अशक्यप्राय बाब असताना केवळ आपल्या मधुर वाणीने २०१६ च्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील युवकांना सुद्धा पक्षात अग्रस्थान देण्यात प्रसाद सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मुस्लिम समाजातील कार्यकर्ते नगरपरिषदेच्या सदस्य पदांवर विराजमान झाले आहेत तेही आत्मअभिमानाने भगवा झेंडा खांद्यावर घेऊनच.
त्यातील एक युवा कार्यकर्ता म्हणजे समीर पन्हाळकर होय.प्रसाद सावंत यांच्या कार्यपद्धती वर खुश होऊन या युवकाने मागील पाच वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून सत्ता स्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते तर प्रसाद भाई जनसंपर्क कार्यालयात जीव ओतून काम करीत आहे. अनेक जेष्ठ, आमदार, खासदार असोत की मुंबई मधील पक्षाचे दिग्गज नेतेमंडळी असोत त्यांच्याशी पन्हाळकर याचा अगदी जवळचा संबंध राहिला आहे. अगदी झपाटलेल्या प्रमाणे हा युवक निस्वार्थी पणाने कामे करीत आहे अशा या निष्ठावंत कार्यकर्त्याचा वाढदिवस प्रसाद सावंत यांनी जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा केला.
त्याला भगवी शाल परिधान करून केक भरवून हा वाढदिवसाचा सोहळा थाटात संपन्न झाला.यावेळी नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, जेष्ठ पत्रकार दत्ता शिंदे, लक्ष्मण कदम, सिताराम शिंदे, गणेश घावरे, सलीम मुजावर, अजमुद्दीन नालबंद,बाळू दाभेकर,अमोल चौगुले ,चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे,माजी नगरसेवक कुलदीप जाधव, राजेश चौधरी, गौरंग वाघेला आदी उपस्थित होते.








Be First to Comment