Press "Enter" to skip to content

नागोठणे ते आमडोशी फाटा रस्ता बंदचा मनसे चा इशारा

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकुब सय्यद ।

नागोठणे ते रोहा आमडोशी ह्या फाट्यावरून रोहा कडे चार चाकी वाहन व मोटर सायकल स्वार प्रवाशी यांना या रस्त्यावरून जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरावस्था अवस्था झाली असून या रस्त्यावर दिड ते दोन फुट खोल खड्डे तसेच दहा ते पंधरा फुट रूंदी चे खड्डे झाले आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अलीबाग व रोहा लक्ष देत नसून त्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालकांना व मोटरसायकल स्वाराना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. त्या रस्त्यावरून जाणं म्हणजे जीव गमवीने झाले आहे त्या रस्त्यावरून वाहनचालक वाहन घेऊन जात असताना प्रवाशांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

नागोठणे ते रोहा आमडोशी फाटा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून यापूर्वी दिनांक 08/10/2020 रोजी नादुरुस्त रस्ता प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने पत्र दिले होते परंतु या परिस्थिती कडे संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभाग अलीबाग व रोहा यांनी लक्ष केंद्रित केले नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पुन्हा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अलीबाग व रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी पत्र देऊन देखील त्या विभागाने दैनदिन अवस्था झालेल्या रस्त्याकडे अध्या पर्यंत लक्ष दिले नसून त्या दैनदिन अवस्था झालेल्या रस्त्यावर लोकांच्या अपघाताची वाट पाहत आहेत की काय या परिस्थितीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नादुरुस्त रस्ता लवकरात लवकर व्हावा अन्यथा तो नादुरुस्त रस्ता बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सांगळे यांच्या आदेशाने व अमोल पेणकर, उपजिल्हा अध्यक्ष रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रल्हाद पारंगे रोहा चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग व रोहा यांनी नागोठणे ते रोहा आमडोशी फाटा हा रस्ता दिनांक 09/12/2020 रोजी नादुरुस्त रस्ता बंद करण्यासाठी अलिबाग ते रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाला व तसेच एक लेखी पत्र निवासी अप्पर जिल्हाधिकारी अलिबाग रायगड व अप्पर पोलिस अधीक्षक अलिबाग रायगड यांना पक्षाने दिला आहे. रोहा तालुक्यातील सर्व नागरिक व या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशी यांनी रस्ताबंद अभियानात सामील व्हावे असे आवाहन प्रल्हाद पारंगे रोहा, तालुका चिटणीस विनायक तेलंगे, तालुका अध्यक्ष मनसे माथाडी कामगार सेना साईनाथ धुळे, तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना गोरखनाथ पारंगे, नागोठणे विभाग अध्यक्ष मंगेश रावकर, रोहा शहर अध्यक्ष अमित पवार, रोहा शहर उपाध्यक्ष आदेश पारंगे, शाखा अध्यक्ष वेलशेत सचिन पारंगे, महाराष्ट्र सैनिक प्रफुल पाटील, महाराष्ट्र सैनिक
शशांत पारंगे, महाराष्ट्र सैनिक मनोज पारंगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-रोहा तालुका सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी केले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.