Press "Enter" to skip to content

चि.वरद मढवी चा वाढदिवस वस्तीगृहातील अनाथ मुलांसोबत साजरा


सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

उलवे येथील किरण एकनाथ मढवी यांचा सुपुत्र चि. वरद याचा ६ वा वाढदिवस न्यु पनवेल येथील कमल अर्णव चँरेटेबल ट्रस्ट संचालित वस्तीगृहातील अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला. वरदच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आई वडिलांनी तेथील मुलांना अप्लोपहार व अन्नदान करुन त्या मुलांच्यावसोयी सुविधांसाठी संस्थेला थोडीफार मदत म्हणुन रोख रक्कम पाच हजार रुपयांची निधी देवुन तेथील मुलांसोबतची एक गोड आठवण म्हणुन आंब्याचे रोप लावुन वाढदिवस संपन्न केला.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सौ. कमल काटकर मँडम, रायगड भुषण मनोज पाटील, आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरूजी, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे गणेश मढवी, किरण मढवी, हेमल मढवी आदी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांचा कोविड -१९ चा संदर्भ लक्षात घेता आणि संस्थेच्या विशेष सुचनेनुसार मोजक्याच उपस्थितीत वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले. तेथील मुलांची शिस्त, वागणुक आणि त्यांचे इतरही कलात्मक गुण पाहुन उपस्थित सर्वजण त्याठिकाणी भारावुन गेले. चिरंजीव वरच चा वाढदिवस दरवर्षी प्रमाणेच काहीतरी सामाजिक उपक्रम करुनच साजरा करण्यात येत असल्यामुळे सर्व थरांतुन त्यांचे कौतुक होत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.