Press "Enter" to skip to content

कोळखे आणि पेठगाव गावातील गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप

डायोसिस ऑफ बिलिवर्स ईस्टर्न ट्रस्टतर्फे करण्यात आले वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

डायोसिस ऑफ बिलिवर्स ईस्टर्न ट्रस्टतर्फे कोळखे आणि पेठगाव गावातील गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कडक हिवाळ्यातील वातावरणातून या कुटुंबाला दिलासा मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गारव्यातून आराम मिळावे यासाठी गरजू कुटुंबांना ब्लँकेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.

यावेळी डायोसिस आॅफ बिलिवर्सं चर्चंच्या आयोजकांनी या डिसेंबर महिन्यात ते रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरजू लोकांना भेट देत राहतील आणि जास्तीत जास्त ब्लँकेट वितरित करणे सुरू ठेवतील.

या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील (जिल्हा परिषद सदस्य) हे उपस्थित होते.राजेद्रं पाटील यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.