सिटी बेल लाइव्ह / पनवेल / प्रतिनिधी :
कोरोना विषाणू साथीचा आजार कोविड -१९ मुळे लॉकडाऊन घोषित केला आहे. मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत लॉकडाऊन केल्याने अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे तर काहीजणांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यापासून चप्पल, सौन्दर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) यांची दुकाने बंद आहेत त्यामुळे राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांच्यावतीने श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील टावरवाडी या आदिवासी वाडीवर राहणाऱ्या नागरिकांना चप्पल – बूट, बांगड्या, टिकल्या व इतर कॉस्मेटिक वस्तूचे वाटप करण्यात आले. दुकाने बंद असल्यामुळे काही दुकानदारांनी हा सर्व माल वाटप करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्याकडे दिला त्यानुसार आज याचे वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, ओमकार महाडिक, अक्षय घाडगे, विजय शिंदे व गौरव भेंडे उपस्थित होते. सदर उपक्रमास सुरज गेहलोत यांनी विशेष सहकार्य केले.






Be First to Comment