मटक्याच्या अड्डयावर धाड टाकून अरोपिला अटक
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली असून मटका अड्डयावर धाड टाकून मटका खेळणार्या गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की कोलाड पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबेवाडी नाक्यावर दि.४ डिसेंबर रोजी ५ वाजून ५ मिनिटांनी आंबेवाडी गावच्या हद्दीत कोलाड आंबेवाडी नाक्यावर बाबा वडापाव गाडीच्या बाजूला पॅरागॉन चप्पल दुकानाच्या जवळ रोडलगत वरील वेळी या ठिकाणी यातील आरोपी आलीम कादीर नुराजी राहणार वरसगाव हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मेन नावाचा मटका हा हारजितचा खेळ खेळतांना दिसून आला त्याला कोलाड पोलिसांनी मुद्देमालासह पकडले असून आरोपी अलीम कादिर नूराजी याच्यावर पोस्टे गुरनं ००७०/२०२० जुगार अधिनियम १८६७ कलम १२ अ, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक श्री सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेअंमलदार एन आर पाटील, एस एन कोकाटे, याकूब आयुब तडवी, पोलिस ठाण्यातील पथक अधिक तपास करीत आहेत मात्र मटका चालवणाऱ्यां माफियांनी कोलाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या कामगिरीचा धसका घेतला असल्याचे समजते, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, यांच्या दमदार कामगिरीमुळे कोलाड परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे








Be First to Comment