Press "Enter" to skip to content

कुसुंबळे विभागात “११ गाव शेतकरी संघटना” स्थापन

अध्यक्षपदी अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांची निवड

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।

ग्रुपग्रामपंचायत कुसुंबळे येथील स्वर्गीय जगन्नाथ गोपाळ केणी सभागृहात नुकतीच शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत ‘ ११ गाव शेतकरी संघटना’ ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. ज्या संघटनेचा मुळ ऊद्देश हा शेतक-यांना योग्य तो भाव व रोजगार मिळावा हा आहे. सर्वानुमते या सर्वपक्षीय संघटनेच्या अध्यक्षपदी राजा केणी यांची नियुक्ती करण्यात आली.

खाडीलगत असणारी कुसुंबळे ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणारी ११ गावे ही प्रामुख्याने खार भागात गणली जात असून येथील शेतक-यांची बरीचशी जमीन ही खारजमिन आहे ज्यामुळे खारजमिनीत अन्नधान्य कमी प्रमाणात येते. सद्यस्थितीत वाढती महागाई, वाढती मजुरी,ज्यामुळे न परवडणारी शेती, त्यात कमी उत्पादन यामुळे अक्षरश: हवादिल व हताश झालेला शेतकरी कर्जबाजारी तर आहेच परंतू हा शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत आहे.या शेतक-यांची बाजू व प्रश्न निर्भीडपणे मांडता यावे व त्यांना योग्य तो न्याय, भाव व रोजगार देता यावा या दृष्टीकोनातुनच या संघटनेची स्थापना करण्यात आली.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राजा केणी म्हणाले कि, प्रामुख्याने हा परिसर इंडस्ट्रीयल असल्यामुळे पुढे येवू घातलेल्या काही प्रकल्पांचा लाभ येथील स्थानिक शेतक-यांना मिळावा व परिसरातील शेतक-यांच्याच अनेक सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या तरुणांना रोजगार मिळावा हा संघटनेचा ऊद्देश असल्याचे ते म्हणाले. ११ गाव शेतकरी संघटनेचे विशेष हे आहे कि, ही संघटना सर्वपक्षीय असून कोणताही भेदभाव व पक्षपात न करता काही नियम,तत्त्व व ऊद्देश समोर ठेवून शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून ही संघटना स्थापन करण्यात आली.

ज्यामध्ये केवळ शेतक-यांचा फायदा कसा होईल, रोजगार व भाव कसा मिळेल यासाठीच प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

११ गाव शेतकरी कार्यकारी संघटनेच्या कार्यकारिणी पदावर अध्यक्ष राजा जगन्नाथ केणी, सेक्रेटरी अनिकेत विष्णू पाटील कातळपाडा , उपाध्यक्ष मन्मय बापू पाटील काचली खार, उत्तम गिरीधर पाटील चिखली खार, गजानन पाटील पिटकिरी खार,किरण दामुदर पाटील वाघविरा खार ,निवास पाटील खातविरा खार खजिनदार प्रमोद पाटील वाघविरा , तर सदस्य महेश वावेकर काचलि, श्रीकांत पाटील काचली, रुपेश वाघ काचलि, विठोबा पाटील पिटकिरी , प्रविण पाटील, राजेश पाटील कातळपाडा, गणेश पाटील, निवास पाटील, सागर पाटील कातळपाडा , रमेश पाटील , सचिन म्हात्रे कुसुंबळे प्रदिप केणी भुषण पाटील हेमनगर,संजय पाटील दिलीप पाटील नवीन वाघविरा विकास वाघ, संतोष महादेव पाटील, सत्यवान पाटील तसेच इ. मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.