Press "Enter" to skip to content

माती दिनाच्या निमित्ताने तहसीलदार इरेश चप्पलवार यांची केळी लागवडला भेट

१२ तरुण शेतकरी एकत्र येऊन सोमाने फॉर्म चौक वांवढळ येथे पिकविला केळ्यांचा मळा : लॉकडाउन च्या काळात तरुण वर्गांची यशस्वी भरारी

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

खालापूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या.ही संस्था स्थापन करुन सोमाने फॉर्म चौक वांवढळ येथे केळी लागवड करण्यात आली असून ती उत्तम प्रकारे झाली असून लागवड केलेल्या केळी प्लॉट वर खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार जावून भेट घेतली.लॉकडाऊन च्या काळामध्ये अनेकांचा रोजगार गेला.मात्र खालापूर तालुक्यातील तरुण शेतकरी एकत्र ऐवून त्यांनी दहा एकर मध्ये दहा हजार केळ्यांची लागवड करण्यात आली.गेले दहा ते बारा महिने मेहनत घेवून या ठिकाणी केळ्याचं नंदनवन फुलले पाहावयास मिळत आहे.

गेल्या दोन वर्षापासून आपण केली लागवड करण्याची संकल्पना निर्माण झाली.मात्र जागेचा प्रश्न,पाणी अदि या सर्व बाबीचा विचार करुन केळी लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.या ठिकाणी असलेल्या सोमाने फॉर्म चौक वांवढळ जवळ ही केळी लागवड करण्यात आली.

केळी लागवड करण्यात आल्यावर कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खते यांचा वापर करण्यात आले.मुंढे हे स्वता गांडूळ खत निर्माण करीत असून केल्याची लागवडीसाठी गांडूळ खत वापर करण्यात आला.तसेच कोंबडीची शिट,जिवामृत,दशपर्णी अर्क,अश्या शेंद्रिय खताचा वापर करण्यात आला होता.यामुळे या केल्यांच्यावरती कोणतेही रासायनिक खताचा वापर न करता संपूर्ण पणे शेंद्रिय खते वापरण्यात आली.त्याच बरोबर एक केल्याचे रोपटे केली येइपर्यंत अंदाजे खर्च १५० रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी आपल्या बुद्धीच्या जोरावर शेतामध्ये विविध पिके घेवू शकतो.मात्र योग्य वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणी शासनांच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचत नसल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष केले जाते मात्र आजही काही शेतकरी वर्ग आहे की भात शेतीच्या समवेत विविध फळ पिके घेण्यास अग्रेसर आहेत शेती हा अर्थ शास्त्राचा कणा असे संबोधले जात आहे.आपल्या रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पन्न घेतले जाते.त्यास समवेत कोकणात आंबा फणस,नारळ,सुपारी असे अनेक पिक घेतली जातात. मात्र केळी लागवड ही तुरळक ठिकाणी लागवड केली जात आहे.मात्र आपण सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून केळी लागवड करुन त्याचे पिक घ्यावयाचे यासाठी गेले दोन वर्ष महाराष्ट्र तसेच अनेक राज्यात जावून यांचा आभ्यास करण्यात आला.आणी आज या ठिकाणी केळी उत्तम प्रकारे आली असून काही दिवसात ती बाजार पेठेत दाखल होइल

यावेळी सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. अध्यक्ष सुभाष मुंढे,उपाध्यक्ष -प्रमोद पवार ,सचिव बाळकृष्ण लबडे, खजिनदार- अविनाश आमले,सदस्य- अविराज बुरूमकर, समिर पिंगळे,दिनेश शिंदे, सुनिल कुरुंगले,भरत साळुंखे,राजेंद्र मोरे, संतोष दळवी, लक्ष्मण मेंगाळ, जयंतीभाई सोमाने,रुपेश लभडे तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते.

कोकणात केळी अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मी स्वता जागेवर हा प्रयोग केला आणी काही महिन्यात मला उत्तम प्रकारे केळी लागवड करुन मिळाली यामुळे त्यांची विक्रीतून नफा मिळाला या माध्यमातून लागवड कशी केली पाहिजे त्यांची निगा,खतपाणी या सर्व बाबीचा आभ्यास करून चौक वांवढळ येथे केली लागवड करण्यात आली आहे.

सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. अध्यक्ष : सुभाष मुंढे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.