Press "Enter" to skip to content

लॉक डाऊन मुळे माथेरान मधील युवा पिढीवर उपासमारीची वेळ

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

रायगड जिल्ह्यातील सुंदर पर्यटनस्थळ माथेरान मध्ये कोरोना रुग्णांचे शून्य प्रमाण असताना देखील जिल्ह्यात कुठे कोरोना रुग्ण वाढले म्हणून संपूर्ण जिल्हा लॉक डाऊन करण्याचा घातकी निर्णय संबंधित अधिकारी वर्गाने त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही राजकीय पक्षांनी घेतल्यामुळे माथेरान सारख्या या दुर्गम पर्यटनस्थळावर केवळ पर्यटन शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना तसेच युवा वर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळेच प्रसंगी अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
कधी नव्हे ती कामे जी इथल्या युवा पिढीने आपल्या स्वप्नांत सुध्दा पाहिली नसतील अशाप्रकारे अतिकष्टदायक हातगाडी ओढण्याची गधामजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाला आधार द्यावा लागत आहे.दोन महिन्यांपूर्वी इथे एक अपवाद वगळता
कोरोना आजाराचे इथे शून्य प्रमाण आहे.मोठमोठ्या सर्व हॉटेल्स इंडस्ट्री मार्च १८ पासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे बंद आहेत. ठराविक मोजकीच दुकाने यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, भाजीपाला, रेशनिंग दुकाने खुली आहेत. मार्च पासून लॉक डाऊन असल्याने आर्थिक मंदी मोठया प्रमाणावर जाणवत आहे.कुणाच्याही हाताला काम नसल्याने नाईलाजाने इथली युवा मंडळी हातगाडीवर कामे करत आहेत.त्यात सुध्दा काहीशा प्रमाणात राजकारणाने शिरकाव केल्यामुळे ही कामे सुध्दा आठवडाभर मिळत नाहीत. जे हाताला काम मिळेल ते करण्याची तयारी आणि मानसिकता युवा वर्गाने घेतली आहे परंतु कामे करण्यासाठी सुध्दा खूपच गर्दी होत आहे.आजपासून (दि.१६ जुलै) जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे इथल्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. निदान या मालवाहतुकीच्या मानवी हातगाड्या तरी सुरू ठेवाव्यात जेणेकरून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.माथेरान मध्ये लॉक डाऊनची आवश्यकता नाही सहसा येथील नागरिक माथेरान बाहेर जात नाहीत. कोरोनाचा शिरकाव गावात होऊ नये यासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर कडक निर्बंध लावले तर गावात कुणीही येऊ शकत नाही.त्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसुन शासकीय आदेश जारी करण्यात आले की त्यामध्ये माथेरानचे नाव सुध्दा आपसूकच येते त्यामुळे निदान जिल्हाधिकारी यांनी तरी इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यापुढे निर्णय घ्यावेत.येथील व्यापारी वर्गाने लवकरात लवकर इथले व्यवसाय कशाप्रकारे पूर्वपदावर येऊ शकतील यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे बनले आहे.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.