Press "Enter" to skip to content

वै.श्री.गुरू गोपाळ बाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २८ वा पुण्यस्मरण सोहळा उत्सहात


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।


कोकण वासियांचे श्रद्धास्थान श्री.गणपतबाबा अलिबागकर महाराज यांच्या फडाचे वंशज वै श्री.गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २८ वा पुण्यस्मरण मिती कार्तिक वद्य ४ शके १९४२ शुक्रवार दि.४/१२/२०२०रोजी श्री. अलिबागकर महाराज कासार घाट पांढरपूर येथे मोठया भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

मिती कार्तिक वद्य ४शके१९४२ शुक्रवार दि.४/१२/२०२०रोजी सकाळी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त पहाटे श्रीची महापुजा,अभिषक,सकाळी८ते१० दिंडी प्रदक्षिणा,पुष्पवृष्टी व नंतर १०.३० ते १२.३० वा.पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प.तुकाराम महाराज शिंदे आळंदी यांचे किर्तन,तसेच रात्री श्री.संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज श्री एकनाथ महाराज नामदास यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली.परंतु कोरोना विषाणूच्या महामारीमूळे या कार्यक्रमासाठी मोजकेच वारकरी उपस्थित होते.तरी सर्व कार्यक्रम ह.भ.प. नारायण दादा वाजे यांच्या कृपा छत्राखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.