सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
समाज कल्याण न्यास संस्थेने उरणमधील गड संवर्धन करणाऱ्या संस्थाचा व त्यांच्या सदस्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच सपन्न झाला.
राज्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी समाज कल्याण न्यास संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेने अनेकांना मदतीचा हातभार देऊन त्यांना समाजात ताठ मानेने उभे केले आहे. अशा या सामाजिक संस्थेने उरणमधील द्रोणागिरी किल्ल्यावरील जोमाने सुरू असलेले संवर्धन बघून त्यांचा मानसन्मान करण्याचे ठरविले. नुकताच हा योग जुळून आला आहे.
या संस्थेने उरणमधील द्रोणागिरी किल्ल्याचे संवर्धन करणाऱ्या नवपरिवर्तन संस्था, दुर्ग मावळा व सह्याद्री प्रतिष्ठान या तीन संस्थाचा व त्यांच्या मावळ्यांचा धर्मसेवक डॉ. सोन्यादादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी समाज कल्याण न्यासचे महाराष्ट्र प्रवक्ता हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष वालीलकर, पत्रकार किशोर पाटील, सुनील घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, नव परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष विरेश मोडखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सोन्यादादा पाटील यांनी संस्थेच्या सदस्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविले.
याप्रसंगी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, नव परिवर्तनचे अध्यक्ष विरेश मोडखरकर, दुर्ग मावळ्याचे नवी मुबंई अध्यक्ष गणेश तांडेल, पत्रकार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून द्रोणागिरी किल्ल्याचे संवर्धन करीत असल्यानेच या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे कोणतेही सामाजिक उपक्रम असतीलतर ही संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. सोन्यादादा पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थितीती उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, नारायण म्हात्रे, लक्ष्मण ठाकूर, किशोर पाटील आदींसह नव परिवर्तन, दुर्ग मावळा व सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याल तर हसालचे निर्माते शेखर म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment