सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।
आई-वडीलांचे सेवेतच जीवनाचे खरे फलित असल्याचे मार्गदर्शनपर विचार ह.भ.प.मदनमहाराज कोलाटकर यांनी व्यक्त केले.
रोहे तालुक्यातील श्री. क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे रहिवासी तथा पत्रकार नंदकुमार मरवडे यांच्या मातोश्री शांतीबाई मरवडे यांच्या अंतिम धार्मिक विधी प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनरूपी सेवेप्रसंगी कोलाटकर महाराज उपस्थितीतांना संबोधित करताना बोलत होते.
यावेळी त्यांनी आई-वडीलांचे आपल्या जीवनातील नेमके स्थान काय आहे. तसेच मुलगा किंवा मुलगी यांची त्यांच्याप्रती नेमकी भूमिका व जबाबदारी काय असते याबाबत मार्गदर्शन करताना आई-वडीलांची उतारवयात केलेली सेवा ही आपल्या पुढील पिढ्यांसाठी फलदायी ठरत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.








Be First to Comment