Press "Enter" to skip to content

रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल व जी.एम.वेदक इन्स्टिटयूटचा शॉर्ट टर्म ट्रैनिंग प्रोग्रॅम संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।

रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल व जी.एम.वेदक इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला शॉर्ट टर्म ट्रैनिंग प्रोग्रॅम उत्साहात पार पडला. झूम वरती १-५ डिसेंबर २०२० कालावधीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी रोह्यातील एकमेव कॅड ट्रैनिंग सेंटर विकास इन्स्टिटयूट एडुकंप दमखाडी एडुकेशन पार्टनर होते.सदर कार्यक्रमाचा विषय 'कॉवीड १९ नंतर करिअर व एन्त्रेप्रेनेऊरशिप संधी' होता.यावेळी ३डी प्रिंटिंग पासून ते google स्टुडन्ट डेव्हलपर्स ते 'एम.ई .पी' मधील करिअर संधी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यात १०० हुन अधिक मुलांनी ह्या प्रोग्रॅम चा लाभ घेतला.

रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल स्पॉन्सर्ड बाय रोटरी क्लब रोहा सेंट्रल हे झोन १,आर.आय.डी ३१३१ चा एक भाग असणाऱ्या या ट्रेनिंग मध्ये आकाश रुमडे,प्रसाद सेठ, रणजीत देशमुख,मानस जोमराज व ऋषिकेश डाळे हे ट्रेनर्स म्हणून उपस्थित होते. रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल असे अनेक प्रोफेशनल डेव्हलोपमेंट कार्यक्रम करून रोह्यात व जवळच्या भागेत तरुणांना प्रगती पथावर नेण्याचा प्रयत्न करीत असून या कार्यक्रमासाठी जयेश चौलकर, प्रतीक्षा सानप,सत्येन देशपांडे, वैष्णवी पोटे,यांनी पुढाकार घेतला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.