Press "Enter" to skip to content

जासई कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यू. कॉलेज जासई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन भक्ती भावाने साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कामगार नेते श्री सुरेश पाटील यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेबानी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र आम्हा भारतीयांना दिला असे मनोगतात सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर मा. अरुण घाग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन चरित्र्याची माहिती दिली.

या प्रसंगी गाव अध्यक्ष आणि सल्लगार समिती सदस्य श्री यशवंत घरत,डी. के. पाटील, ठाकूर एस. एम, मुंबईकर, राजू भोईर हे सेवक उपस्थित होते. रयत सेवक संघांचे उपाध्यक्ष श्री नुरा शेख सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.