Press "Enter" to skip to content

मन्सूर धनसे यांची श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । याकूब सय्यद ।

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी माननीय मन्सूर धनसे यांची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विचार महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस युवा कार्यकर्ते मनसुर धनसे यांनी सामाजिक कार्य केले आहे. त्या कार्याची ची दखल एडवोकेट प्रथमेश पाटील रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी घेऊन श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष पदी मन्सूर धनसे यांची निवड केली तसेच त्यांना नियुक्ती पत्र ही दिले व मन्सूर धनसे यांना त्यांच्या पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मन्सूर धनसे यांची श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी निवडीची बातमी सर्वत्र पसरतात धनसे यांच्यावर काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून व सर्वत्र स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.