Press "Enter" to skip to content

वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक व पाॅसिंगसाठी जमीन उपलब्ध करून द्या

शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

नागरिकारिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे असून या कार्यालयांतर्गत नागरिकांना विनासायास वाहनाविषयक तसेच अन्य तत्सम कामांविषयी शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या माध्यमातून हजारों वाहनांच्या पाॅसिग व टेस्टची सोय मध्यवर्ती ठिकाणी व्हावी यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी केली असून याबाबतचे निवेदन परिवहन मंत्री अनिल परब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे सादर करणार आहे.

पेण प्रादेशिक परिवहन पनवेल आरटीओच्या अखात्यरित्या असून माणगांव, पोलादपूर, पेण रोहा व आजूबाजूच्या परिसरातील वाहनांसाठी टेस्ट ट्रॅक साठी जमीन मंजूर केले आहे त्याच धर्तीवर चौक,रसायनी, खोपोली, खालापूर,कर्जत,नेरळ या परिसरातील वाहनांसाठी कर्जत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाची जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी टेस्ट ट्रॅकसाठी जागा मंजूर करून वाहनांची पाॅसिग व टेस्टची सोय करावी कर्जत, खालापूर व अन्य भागातून तळोजा येथे वाहने नेताना प्रचंड डिझेल व पेट्रोल खर्च करावा लागतो. त्यातच शेंडुगनाका व पुढे टोल भरावा लागतो.त्यामुळे वेळ व पैसा खर्च होत असतो,जर कर्जत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी वाहनांच्या टेस्ट व पाॅसिगसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहनचालकांना देखील दिलासा मिळेल प्रसंगी वेळ व पैसा दोन्हीची बचत होईल तरी तहसीलदार व आरटीओ ने वेळीच लक्ष केंद्रित करून पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

“शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रादेशिक अधिकारी कार्यालयास जवळपास किमान 250मीटर लांबीचा ट्रॅक उपलब्ध करणे आवश्यक आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रादेशिक /उपप्रादेशिक कार्यालयाना वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रेकसाठी तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी शासनाने जागा मंजूर करून तेथे वाहनांची ब्रेक टेस्ट पासिंग होऊन वेळेची व खर्चाची बचत होईल त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल”.

अरविंद भागवत,प्रोपायटर अनुपमा मोटार ट्रेनिंग स्कुल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.