Press "Enter" to skip to content

बिर्ला कार्बंन कंपनीकडून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

पातालगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय शिक्षण विभाग अलिबाग यांच्या आदेशानुसार व जीवन कला मंडळ रसायनी चे अध्यक्ष तुलसीदास पाटील यांच्या सुचनेनुसार कोविड-१९ संदर्भात योग्य ती खबरदारी व काळजी घेऊन नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

वडगाव वाशिवली ग्रुप ग्रामपंचायत यांच्यातर्फे सर्व वर्ग प्रयोगशाळा यांची फवारणी करण्यात आली. नंतर सर्व शिक्षकांनी कोविड-१९ चाचणी करून घेतली, सुदैवाने सर्व शिक्षक व शिक्षिका यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. बिर्ला कार्बंन इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश देसाई व सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या प्रयत्नाने विद्यालयातील नववी ते बारावी सर्व विद्यार्थ्यांना मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले व सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्राचार्य विष्णू चेंडगेसर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. अनिल पाटील, एकनाथ सोनवणे, प्राचार्यं मोतीलाल सोनवणे, प्रा. संजय राणे, कलाशिक्षक संजय मोरे ,प्रा. भास्कर जावळे, नाना सोनवणे, सारिका पाटील, शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ लेखनिक अनिल पगारे , सखाराम हिंदोला , शशिकांत कावरे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातर्फे बिर्ला कार्बंन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.