सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
संघर्ष वाहन चालक -मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांची नागोठणे परिसरातील सर्व वाहन चालक -मालक सभा हाॅटेल रुची येथे संपन्न झाली. याच सभेचे कामकाज चालू करताना कोकण प्रांतचे अध्यक्ष दिनेशभाऊ दुर्गावले यांच्या उपस्थितीत रायगडचा ढाण्या वाघ,डॕशिंग नेतृत्व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांची पत्र देऊन संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी एक मताने निवड करण्यात आली.
सदर सभेचे अध्यक्ष रमाकांतभाऊ म्हात्रे व कमलाकरजी सुर्वे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नागोठणे विभाग अध्यक्षपदी किरण देवरे तर उपाध्यक्ष किशोर नागोठणेकर, सचिव नागेश सुर्वे, सहसचिव पदी रामु नायकोडी तसेच रोहा तालुका संघटक पदी किशोर दळवी, रोहा तालुका अध्यक्ष पदी दिपक दुर्गावले यांची निवड करण्यात आली. महेश खांडेकर यांची नागोठणे विभाग संघटक,मनोज बुरुमकर यांची उपकार्याध्यक्ष,तरसमीर कदम यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले की, आपण मला बोलावून माझी अचानक निवड केलीत त्याबद्दल मी आपला आभारी असून सदरचे पद मी स्विकारत आहे. परंतु आपल्या संघटनेचे काम जोमाने वाढले पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे सदर संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये. राजकीय पादत्राने बाजूला ठेऊन तुम्ही आम्ही काम केले पाहिजे. काही लोक संघटनेमध्ये राजकारण करीत असल्यामुळे अनेक संघटना, मंडळ बंद पडलेल्या आहेत. नागोठणे विभागात अशा ब-याचशा संघटित संघटनेमध्ये स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी राजकारण केल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. सदरची संघटनेला मजबुतीपणा यावा यासाठी दरमहा मिटींग होणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. त्यासाठी आपण आपली ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. आपण सर्व एक दिलाने सःघटनेचा काम करु या संघटना वाढवू या असे आवाहन शेवटी किशोरभाई म्हात्रे यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांना केले.








Be First to Comment