सेवा सोशल सर्विस सोसायटी यांचा उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून कोरोना च्या पाश्वभुमी वर नागरिकांची सुरक्षा घ्यावी या उद्देशाने तळवली दांडवाडी येथे अदिवासी महिला वर्गांना सुरक्षा किट देण्यात आले. यामध्ये मास्क, साबण, स्टेपी फ्री ( पॅड )ब्लीचिंग पावडर सॅनिटायजर अदि वस्तू वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दंत चिकित्सा करण्यात आली. यावेळी या वाडीतील महिला वर्गांनी आपले दंत तपासणी करुन घेतली.
सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून A.C.I. Cumballa हॉस्पिटल मुंबई आणि एसीयन कॅन्सर फॉंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने नागरिकांची दंत चिकित्सा करण्यात आली.सेवा सोशल हे विविध उपक्रम राबवित असतांना सामजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे ही संस्था आदिवासी महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबविण्यात सातत्याने पुढाकार घेत असते. यावेळी तळवली दांडवाडीत ओरल कॅन्सर क्लिनिंग क्लॅम घेण्यात आले.
यावेळी या वाडीतील महिला वर्ग तसेच लहान मुलींची दंत चिकित्सा करण्यात आली. या संस्थे चे अध्यक्ष फादर सोनू सॅम, मॅनेजर लिजॉय जोसेफ, प्रकल्प समन्वयक मंगेश भंडारे कांचन सांवत, वासंती धांदृत, जगदीश चाळके तसेच गृप ग्राम पंचायत वडगांव सदस्य संदेश मालकर,आशा कार्यकर्ता संगिता दिलीप मालकर,अदि उपस्थित होते.








Be First to Comment