सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालुक्याच्या विकासाचे महामेरू कै.दत्ताजीराव तटकरे यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधुन रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेला सुरवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवुन योजनेच्या कामाला सुरवात करताना माजी सभापती. लक्ष्मुण महाले, हायस्कूलचे चेअरमन भगवान गोवर्धने, माजी सरपंच दिपक दाईटकर, युवानेते मयूरजी खैरे, गजानन खांडेकर, तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर, माजी सरपंच विलास उंबरे, माजी सरपंच संतोष सुतार, ग्रामपंचायत सदस्य उदय मोरे, सदस्य रविंद्र जाधव, नथुराम महाले, विजय मोरे, चंद्रकांत गोवर्धने, प्रदीप घरट, रवि मोहिते, भिसे तंटामुक्त अध्यक्ष हरिचंद्र ठमके, तानाजी घरट महेंद्र घरट, आत्मराम पवार, संतोष पवार, छगन लाड, यांच्यासह ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा लवकरच लोकार्पण सोहळा खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सरपंच स्नेहा खैरे यांनी दिली.








Be First to Comment