सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आंबेवाडी-कोलाड रोहा रोड लगत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबेवाडी नाक्यात कै द.ग तटकरे चौक नामकरणाचा तसेच शौचालय,बांधकाम लोकसहभागातून कारंजा सुशोभीकरनाचा लोकार्पण सोहळा खा.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला आहे.
कै.द ग तटकरे (आणा) यांच्या जयंती निमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आंबेवाडी नाक्यात दत्ताजीराव (आणा).ग. तटकरे चौक नामकरण सोहळा तसेच नवीन शौचालय,बांधकाम लोकसहभागातून कारंजा विदूत पद दिवा,सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास रा.कॉ कार्य अध्यक्ष मधुकर पाटील, नगर अध्यक्ष संतोष पोटफोडे, सरचिटणीस विजय मोरे भाई टक्के, नंदू म्हात्रे ,रामा सकपाळ, प.सदस्य वीणाताई चितळकर, सिद्धी राजीवले,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,मा सभापती मोतीराम तेलंगे,दयाराम पवार,सदस्य रा.जी प.सदस्य,सुनीता महाबळे मा.सभापती ,जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,नारायण धनवी,तानाजी जाधव,प्रकाश थिटे,वसत मरवडे,बाबुराव बामणे,महेंद्र पोटफोडे,मनोज शिर्के, मा.सरपंच संतोष बाईत ,संजय राजीवले, संजय मांडूलसकर,सुशील शिंदे,महेंद्र वाचकवडे उत्तम बाईत,संदीप जाधव, राकेश शिंदे,नरेंद्र पवार,राजेश कदम , उपसरपंच श्रीकांत चव्हाण, सदस्य जगन्नाथन धनावडे,प्रितम पाटील,कुमार लोखंडे,कांचन वाचकवडे, वृषाली लोखंडे, कोलाड ,खांब ,सुतारवाडी परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,कार्यकर्ते आंबेवाडी ग्रामस्थ, मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा सुनील तटकरे म्हणाले की, राज्याच्या राजकारनात कोलाड आंबेवाडी नाका हा नेहमीच केंद्र बिंदू राहिला असून,याच नाक्याने कै.आ.दादासाहेब सानप, मा.अनिल भाऊ तटकरे,आ.अवधूत तटकरे, आ.अनिकेत तटकरे ,कु अदिती तटकरे व मी असे सहा आमदार दिले आहेत. आज आंबेवाडी ग्रामपंचायतीने या नाक्याला कै कै.द ग तटकरे आणा यांचे नाव सुचवल्याने तटकरे कुटुंब आपला कायम ऋणी असून याच कोलाड आंबेवाडी नाक्यातील उर्वरित विकास कामे लवकरच मार्गी लाहू असे आश्वासन खा तटकरे यांनी सरपंच सुरेश महाबळे याना दिले,
तर आ.अनिकेत तटकरे म्हणाले की,आज या आंबेवाडी नाक्याला आपण आणाचे नावं सुचवलेत त्याबद्दल मी आपला आभारी असून हे काम अवघ्या ८ दिवसांत पूर्ण करणाऱ्या व या कामासाठी मदत करणाऱ्या सर्व व्यापारी वर्ग,आंबेवाडी ग्रामपंचायत, कामगार वर्ग एकता प्रतिष्ठान यांचे आभार मानले तर राजकारणातील केंद्र बिंदू ठरणाऱ्या या परिसरातील खांब सुकेळी पासून, वरसगाव पर्यंत चा लवकरच कायापालट करू असे म्हणाले.
या नामकरण सोहळ्यासाठी अवघ्या ८दिवसात काम करणाऱ्या सर्वाना खा सुनिल तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तर आंबेवाडी नाक्याला दत्ताजीराव (आणा).ग.तटकरे चौक असे नामकरण केल्याने कार्यकर्त्यांना मध्ये उत्साह दिसून येत आहे.








Be First to Comment