सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नागोठण्यातील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधील शास्त्र शाखेचे सर्व ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कुमारी आस्था मंगेश गोनजी ही विद्यार्थीनी ८०.१५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमारी सरिता पटनदिन सिंग (७९. ८५ टक्के) व कुमारी निधी सलिल सोमन (७९.५४ टक्के) या अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष अविनाश श्रिखंडे व रिलायन्सच्या एच.आर. विभागाचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष चेतन वाळंज, मुख्याध्यापिका सिमा कुलकर्णी यांच्यासह शाळेच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.






Be First to Comment