सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
मुंबई महानगर प्रदेशातील लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने पुढील दोन वर्षाकरिता प्राधिकरणाच्या बैठकींसाठी मा. प्रेरणा प्रसाद सावंत यांची निमंत्रित सदस्या म्हणून निवड करण्यात आली आहे, या पूर्वी माथेरान नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री .अजय काशिनाथ सावंत यांची त्या वेळेला निवड झाली होती तेव्हा त्यांनी अंदाजे १२३ कोटी रुपये एवढा भेईब निधी MMRDA कडून माथेरान साठी प्राप्त करून घेतला होता.
सौ .प्रेरणा प्रसाद सावंत अध्यक्षा माथेरान नगरपरिषद यांचा मागील ४ वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव पाहता तसेच त्यांचा कार्यहवाल व कामाची पद्धत, वक्तृत्व पद्धत यामुळे त्यांची यासाठी महानगर आयुक्त यांनी निवड केली आहे. माथेरानच्या विकासासाठी निधी शासनाकडून प्राप्त करून घेण्याची त्यांची किमया आणि पाठपुरावा नक्कीच उपयोगी येईल तसेच माथेरानच्या विकासासाठी MMRDA कडून भविष्यात भरघोस निधी उपलब्ध होईल यात शंका नाही.
यावेळी त्यांचा नगरपरिषदेच्या कार्यालयातमुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्या हस्ते छोटेखानी सत्कार करण्यात आला यावेळी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक रणजित कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिंदे, नरेश काळे,शकील पटेल आदी उपस्थित होते. माथेरान मधील नागरिकांनी सुध्दा प्रत्यक्ष भेट घेऊन नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment