सिटी बेल लाइव्ह / पनवेल/प्रतिनिधी #
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळी लावणीच्या कलाकारांमध्ये सध्याच्या काळात अग्रस्थानी असलेल्या सिनेअभिनेत्री विजय पालव ज्यांच्या नावासमोर लावणी क्विन, लावणी सम्राज्ञी, लावण्यवती अशी विरुदावली परफेक्ट वाटतात त्या पालव यांनी खास प्रेक्षकांसाठी कोरोना स्पेशल लावणी आणली असून वर्क फ्रॉम होम मध्ये त्याचे सादरीकरण केले आहे याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
जगात कोरोना ने थैमान घातले आहे आपल्या भारत देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादर्भावामुळे सर्व क्षेत्रे ठप्प झाले आहेत महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक आहे कोणतेच औषध न आल्याने याची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रथम जमावबंदी, संचारबंदी आणि अखेरीस लॉकडाऊन लागू केले मात्र तरीही काही अतिउत्साही नागरिकांमुळे गर्दी होताना दिसत होती. त्यातच लॉकडाऊनला थोडीशी शिथिलता दिली यांचा काही मंडळीनी गैरफायदा घेतला यांचा परिणाम असा झाला की ठाणे मुंबई आणि ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांना यांचे गाभीर्य कधी कळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता
कोरोनाच्या धसक्याने मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील सिनेनाट्य अभिनेते आणि अभिनेत्री गप्पगार घरी बसले होते. जो तो आपापल्या परीने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करित होते. पण सिनेअभिनेत्री लावणीक्विन, लावणीसम्राज्ञी विजया पालव यांनी थोडे हटके खास प्रेक्षकासाठी ‘अहो राया तुम्ही गप्प घरात बसा’ अशी कोरोना स्पेशल लावणी यामध्ये त्यांनी तयार केली व त्यावर आपल्या लडियार, नरेल मादक अदांनी नृत्यही केले. कोरोनोच्या संदर्भात जनजागृती करुज सैनिटायझर, हॅण्डवॉश आणि मास्कचा वापर करणे किती गरजेचे आहे हे आपल्या अदाकारीतून सादरीकरण केले आहे. हे सर्व वर्क फ्रॉम होम सादरीकरण केले याला मोठ्या प्रमाणात पेक्षकांची पंसती मिळत आहे.
मराठी चित्रपट अभिनेत्री विजया पालव यांना लावणी या कला प्रकारात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेफ बक्षिसे, अवार्ड मिळाले आहे आद्य लावणी सम्राज्ञी लिला गांधी, जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांनी विजया पालव यांच्या लावणीचा गौरव केला आहे. त्यांनी सध्याच्या परिस्थितीत कोरोनोच्या वाढत्या काळात केलेली जनजागृती व त्यातून केलेली जनजागृती त्यातून घरी राहण्याचा दिलेला संदेश महत्त्वाचा आहे.






Be First to Comment