अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात सापडला साप
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या कोव्हिडं 19 विभाग(वॉर्ड)परिसरात सापडलेल्या धामण जातीच्या सर्पाला सर्पमित्र अक्षय म्हात्रे याने जीवनदान दिले.धामण जातीच्या सर्पाला जीवनदान देत असताना त्या सर्पाने सर्पमित्र अक्षय म्हात्रे याच्या हाताला दंश करून जखमी केले.
अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या कोव्हिडं 19 विभाग(वॉर्ड)परिसरात तिथे अचानक धामण साप दिसला तो पूर्णपणे जाळ्यात अडकला होता त्यावेळी जिल्हा रुग्णालयातुन सागर पेरेकर यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आले. सागर पेरेकर ह्या त्यांच्या मित्राला याची कल्पना देत सांगितले की अक्षय म्हात्रे (सर्पमित्र ) याला लवकर जिल्हा सामान्य रुग्णालयात असणाऱ्या कोव्हिडं 19 वॉर्ड येथे पाठविण्यास सांगितले.अक्षय आल्या नंतर त्यानी त्या सापाची जाळीमधून सुटका करीत असताना सापाने अक्षयच्या बोटाला दंश केला तरी अक्षय थांबला नाही अणि त्या धामण सापाला पूर्ण पणे सुखरूप बाहेर काढले मग स्वताच्या हाताला औषध लावले.
अक्षय म्हात्रे यांच्या हाताला दंश केला असला तरी त्याने प्रथम त्या धामणला जीवदान दिले तद्नंतर त्याने स्वतःवर उपचार केले हे खरोखर कौतुकास्पद आहे.तरी शासनाने या सर्पमित्र यांच्या आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे असे युवा सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांनी सांगितले








Be First to Comment