सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
मोहोपाडा येथे महिनाभर सुरू असलेल्या काकडा आरतीची सांगता झाली. त्रिपुरीपौर्णिमा निमित्ताने मोहोपाडा गावातून पालखी सोहळा पार पडला. यावेळी मोहोपाडा गावातील ग्रामस्थ महिलांनी गावातील रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढून रंगभरुन सजावट केली होती.कोजागिरी पौर्णिमाला पहाटे सुरू झालेला काकडा विधिवत पूजाअर्चा करून आज त्रिपुरीपौर्णिमाच्या पहाटे संपन्न झाला.

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री दत्त मंदिरात सोमवारी पहाटेपासूनच किर्तंन करुन पुजा अर्चा करीत काकड आरतीची सांगता करण्यात आली.यावेली रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी पहाटे मोहोपाडा गावातून हरिनामाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेली मोहोपाडा ग्रामस्थ महिलावर्गं व लहानग्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती.








Be First to Comment