Press "Enter" to skip to content

किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व जनजागृती पद रॅलीचे आयोजन

एड्स जागतिक दिनानिमित्त श्री समर्थ सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

श्री समर्थ सामाजिक संस्थे अंतर्गत 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवसाचे औचित्य साधुन पाताळगंगा विभागातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एड्स जनजागृती पद रैली काढण्यात आली.कोरोनाच सावट लक्षात घेत सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन कोरोना प्रमानेच जागतिक समस्या बनलेल्या एड्स आजराची जागृती ही तितकीच महत्वाची आहे. ही जाणीव ठेऊन गेली 15 वर्ष एड्स जनजागृतीचे कार्य करणारे श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील करीत आहेत.

दरवर्षी 1 डिसेंबर एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन या संस्थेच्या वतीने करण्यात येते.यावेळी किशोरवयीन विद्यार्थ्यांना एड्स आजाराची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या मनातील या आजराची भीती व गैरसमज अरविंद पाटील यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे दूर केला.

या कार्यक्रमप्रसंगी काशिनाथ खुडे, छात्रभारतीचे जितेश किर्दंगुडे, जीवन कला मंडळ रसायनीचे अध्यक्ष तुलसीदास पाटील, कोषाध्यक्ष डॉ.ए.आर. पाटील, सहचिटणीस अनंता भोईर,प्रा. मोतीलाल सोनवणे, एकनाथ पाटील, रघुनाथ पाटील, प्राचार्य विष्णू चेंडगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसह बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.यावेली श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी 1 डिसेंबर रोजी वाशिवलीसह परीसरात एड्स या महाभयंकर आजारांवर जनजागृती केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.