Press "Enter" to skip to content

खोपोलीत बांधकाम व्यावसायिकावर 420 चा गुन्हा दाखल : १५ लाखांची फसवणूक

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

नवीन इमारतीत गाळा देतो असे सांगून 15 लाख रूपये उकळणा-या बांधकाम व्यावसायिका विरोधात कलम 420 अन्वये फसवणूकिचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार भरत हरिभाऊ काकङे (वय54, रा.बाजारपेठ खोपोली ता.खालापूर) याना मे 2017मध्ये खोपोली मधील अरिहंत  टाँवरच्या अरिहंत बांधकाम कार्यालयात बांधकाम व्यावसायिक हसमुख राठोङ (रा.खोपोली ता.खालापूर) यांनी  इमारतीचा प्लॅन दाखवून पाटणकर चौकातील डॉक्टर परांजपे हॉस्पीटल  काटरंग या ठिकाणी नवीन इमारत सुरू करणार आहे असे सांगितले.

त्यामध्ये सदनिका व गाळे विक्रीसाठी आहेत त्यामध्ये तळमजल्यावर 4 गाळे असून त्यापैकी एक गाळा भरत काकङे याना  विकत देतो असे सांगितले. सदरचा गाळा हा 400 स्क्वेअर फुट कारपेट 235 स्क्वेअर आहे त्याची किंमत 29लाख 11हजार रूपये होईल असे राठोङ यानी  सांगितले .गाळ्याचा व्यवहार ठरल्यानंतर काकङे यानी  15 लाख रूपये हसमुख राठोङ याला दिले. परंतु रक्कम घेवून तीन वर्ष उलटून सुद्धा अद्यापपर्यंत कोणतेही बांधकाम सुरू  झालेले नाहि.काकङे यानी 15 लाख रूपये परत मागितले असता बांधकाम व्यावसायिक राठोङ चुकीची व दिशाभुल करणारी उत्तरे देवून टाळाटाळ करू लागला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काकङे यानी खोपोली पोलीस ठाण्यात राठोङ विरोधात तक्रार दिली आहे.याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे  भा.दं.वि.कलम  420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि सतीष आस्वर  हे करित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.