Press "Enter" to skip to content

पोलादपूर नगरपंचायतीतर्फे 2021 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण विषयक विविध उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।

पोलादपूर नगरपंचायत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात असताना सदरच्या निवडणूकची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी 2021 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण विषयक विविध उपक्रम आयोजित करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजन पवार आणि मुख्याधिकारी विराज लबडे यांनी संयुक्तरित्या प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

स्वच्छ सर्वेक्षण-2021 अंतर्गत पोलादपूर नगरपंचायतमार्फत विविध जनजागृती उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पथनाटये, वासुदेव फेरी, होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच स्वच्छ हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, कार्यालय, सोसायटी यांचेही होणार मूल्यांकन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भारत देश स्वच्छ व सुंदर बनविणे आणि घनकच-याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशातून ‘स्वच्छ भारत मिशन’ या मोहिमेची 2 ऑॅक्टोबर 2014 पासून देशपातळीवर सुरुवात झाली. या मोहिमेस यशस्वी करण्याकरीता केंद्र सरकार मार्फत देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वच्छतेसंबंधी विविध निकषांवर आधारित स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेची पोलादपूर नगरपंचायतप्मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरु असून या स्पर्धेचा एक भाग म्हणून पोलादपूर शहरातील नागरिक व आस्थापना मालक यांना स्वच्छतेसाठी प्रव्रुत्त करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध प्रभागात पथनाटये, वासुदेव फेरी, होम मिनिस्टर इत्यादी कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विराज आत्माराम लबडे यांनी दिली.

पोलादपूर शहरातील व्यापारी आस्थापनामध्ये स्वच्छता राखली जाणे ही शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक बाब असून कोरोना महामारीच्या पाश्र्वाभुमीवर याचे महत्व आणखीनच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे स्वच्छतेशी संबंधित आणि विविध निकषाच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या या जनजागृती उपक्रमामध्ये शहरातील नागरीकांनी व आस्थापनांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवून पोलादपूर शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजन पवार यांनीही यावेळी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.