Press "Enter" to skip to content

कै. द. ग. तटकरे यांच्या जयंती निमित्त जुन्या आठवणींना उजाळा

नागोठण्यात जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

तत्कालीन समाज सेवक कै. द. ग. तटकरे (आण्णा ) यांची ९३ वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके यांच्या नागोठणे येथील निवासस्थानी गुरूवारी (दि.३) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेतेगणांनी अण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान अण्णांच्या जयंतीचे औचित्य साधून अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कै. द. ग. तटकरे हे तत्कालीन जेष्ठ समाजसेवक कै. तात्यासाहेब टके यांचे परममित्र होते म्हणून अण्णांचे नागोठणे वर विशेष प्रेम होते तसेच ते प्रेम खासदार तटकरे यांनी अजूनही कायम ठेवलेले आहे. अण्णांनी १७ वर्ष रोहा पं. स. सभापतींची यशस्वी जबाबदारी पार पडली होती. आण्णांनी त्यांच्या कारकिर्दीत उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाची मदत केली होती. त्यावेळी नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार नविन सोष्टे यांनी अण्णांवर उन्हाळी भात शेतीचे जनक असा लेख लिहला होता असे युवक राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.

माजी जि. प. सदस्य जेष्ठ नेते नरेंद्र जैन यांनी सांगितले की, अण्णांनी त्यांच्या काळात नागोठण्यात जी राजकारणाची घडी बसवलेली होती ती घडी आजही कायम आहे. त्या काळी पक्षाची बैठक कै. तात्यासाहेब टके यांच्या निवासस्थानी होत होती आजही ती परंपरा कायम आहे.

अण्णांमुळे आपल्याला खा. सुनिल ताटकरेंसारखे महान व्यक्तिमत्व लाभले हे आपले भाग्य आहे असे सांगून जैन म्हणाले की, आम्ही नागोठणे विभागातील जेष्ठ मंडळी तसेच युवक मंडळी नेहमीच खासदार तटकरे, पालकमंत्री तटकरे व आमदार तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे शेवटी नरेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी रोहा पं. स. चे माजी सदस्य हरिष काळे, नागोठणे माजी सरपंच लियाकत कडवेकर, जेष्ठ नेते समद अधिकारी व पांडुरंग म्हात्रे यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.

अण्णांच्या जयंती निमित्त संपन्न झालेले कार्यक्रमास नरेंद्र जैन, भाईसा टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, नारायण भोईर (गुरुजी), हरिष काळे, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, समद अधिकारी, रियाज अधिकारी, विठूशेठ म्हात्रे, युवा नेते राकेश शिंदे, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे, बाळासाहेब टके, हिराजी शिंदे, विनय गोळे, पिगोंडे सरपंच संतोष कोळी, पाटणसई ग्रा. पं. सदस्य सचिन कळसकर, दिनेश घाग, पांडुरंग म्हात्रे, दत्तात्रेय करजेकर, बिपीन सोष्टे, महेंद्र हंबीर, अशोक पाटील, दशरथ कुथे, दत्तात्रय सुरावकर, रोहिदास हातनोलकर बबन अडसुळे, किशोर कदम, मनोज टके, चेतन टके, धृव सोष्टे, शंकर भालेकर, सौ. सुजाता जवके, सौ. आशा शिर्के, सौ. प्रतिभा तेरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.