सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे ( नंदकुमार मरवडे )
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर )विद्यालय कै द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या महाविद्यालयाचा एच.एस.सी.२०२०चा निकाल ८० % इतका लागला आहे.
गोर गरीब विद्यार्थ्यांना काँलेजचे शिक्षण सहजसाध्य व्हावे या उद्देशाने ग्रामीण भागात स्थापना करण्यात आलेल्या या काँलेजचा दरवर्षी एच.एस.सी.परीक्षेचा निकाल चांगला लागत आला आहे.
तर येथे शिक्षण घेत असलेल्या कै द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल आज दि १६ जुलै रोजी लागला असून,येथे शिकणाऱ्या कु.जाधव वर्षा जयवंत ८०.३०% प्रथम कु.चोरगे सोनाली संजय ६६.७६% द्वितीय, कु.शेडगे प्राची किसन ६०% तृतीय,कु.अतोणकर वैष्णवी नथुराम ५८.९२% चतुर्थ,कु गोसावी दिव्या जनार्दन .८२५६ % यां विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
या क्रमांक पटकावलेल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांचे
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर),चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे,सचिव धोंडू कचरे,शालेय समिती अध्यक्ष प्रकाश थिटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळाराम धामणसे, मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन व्यक्त करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीशुभेच्छा दिल्या आहेत.
.






Be First to Comment