Press "Enter" to skip to content

आधार केंद्रावर करण्यात आली शासनाची फसवणूक : दोघांना अटक

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

शहरातील साईनगर येथील आधार केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी संगनमताने बोटाच्या ठश्यांचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करून शासनाची व केंद्रावर येणार्‍या लोकांची फसवणूक करण्याकरिता केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

यातील आरोपी प्रितेश संभावडे व सुजल काथारा यांनी संगनमताने शॉप नं.5, गुरुपुष्प बिल्डींग साईनगर पनवेल येथे गुरुकृपा एंटरप्रायझेस या नावाने चालू असलेल्या आधार केंद्राच्या ऐनरोलमेंट सेंटर या ठिकाणी आपसात संनगमत करून स्वतःच्या फायद्याकरिता आधार सिस्टीमध्ये लॉगीन करण्याकरिता अधिकृत व्यक्ती असणारे सुजल काथारा याच्या बोटाच्या ठशाचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करीत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय जोशी, सपोनि अमोल शिंदे, शिवाजी हुलगे, पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर, दिपक पारध्ये यांनी व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

तसेच त्यांच्याकडून क्रोजेंन्ट कंपनीचे फिंगरप्रिंट, बायोमेट्रीक डिव्हाईस, लॅपटॉप, प्रिंटर, वेब कॅमेरा, एक रबरी थम्स इंजेक्शन असा मिळून जवळपास 1,09,999/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि अमोल शिंदे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.