सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।
रोहे तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे सुपुत्र तथा रोहे प्रेस क्लबचे सचिव व पत्रकार नंदकुमार मरवडे यांच्या मातोश्री शांतीबाई मरवडे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खद निधन प्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांनी मरवडे परिवाराची सदिच्छा भेट घेऊन सात्वंन केले.
यावेळी त्यांच्या समवेत पं.स.माजी सभापती विना चितळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रा.जि. युवक उपाध्यक्ष उदय जवके,तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,माजी अध्यक्ष महेंद्र पोटफोडे,युवा कार्यकर्ते मनोज शिर्के,वसंत भोईर,सूरज कचरे,उमेश लोखंडे आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान मरवडे परिवाराचे सात्वंन करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी मिलिंद अष्टिवकर, रोहे प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, मा.अध्यक्ष महेश बामुगडे सर्वश्री रामचंद्र चितळकर, बाबूराव बामणे,प्रकाश थिटे, शिवराम शिंदे,शिवराम महाबळे,मारूती खांडेकर, अनंत थिटे,सतिश भगत,दिनेश सानप,धनाजी लोखंडे, नाना शिंदे,शांताराम महाडिक,नारायण महाडिक,मनोहर महाबळे,बाबू माहित,बाळा भोईर, संतोष भोईर,दयाराम भोईर,सुमीत जाधव,किशोर जाधव,अजय कापसे,निवास थळे,नंदू कलमकर आदीं विविध क्षेत्रातील मान्रवर मंडळींनी
मरवडे परिवाराची सदिच्छा भेट घेऊन सात्वंन केले.








Be First to Comment