खालापुरात कोव्हिडं रुग्णासाठी उपचार केंद्र सुरू करा अन्यथा आमरण उपोषण – मनोज कळमकर (अध्यक्ष-खालापूर तालुका पञकार संघ)
सिटी बेल लाइव्ह /=खालापूर #
रायगङमध्ये लाॅकङाऊनची केलेली घोषणा हि कोरोना लढाईत शासनाचे अपयश झाकण्याचा मार्ग असून खालापूर तालुक्यात कोव्हीङ रूग्णाना उपचारासाठी वणवण करावी लागत असताना त्यासाठी ठोस उपाययोजनेत प्रशासन कमी पङत आहे.खालापूर तालुक्यात चारशेकङे रूग्ण संख्या गेली असून 13मृत्यू झाले आहेत. त्यामुळे खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असताना असून खालापुरात कोव्हिडं रुग्णासाठी उपचार केंद्र येत्या पंधरा दिवसात सुरू करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार मनोज कळमकर यांनी दिला आहे, तसे त्यांनी पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड व तहसीलदार खालापूर यांना दिले आहे,
पाच महिन्यानंतर जाग आल्यानंतर कोव्हीङ रूग्णालयासाठी खोपोलीत प्रयत्न झाले.परंतु ते मर्यादित ठरले असून ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर कमतरता प्रर्कषाने जाणवत आहे.पनवेल पासून पुढे व्हेंटीलेटर बेङच शिल्लक नसल्याचे रूग्णालय सांगत असून कोरोना रूग्णाना जीव गमवावा लागत आहे.इंजेक्शनाचा प्रचंङ काळाबाजार सुरू असून 31110रूपये ते 90हजार रूपये मोजून देखील सिप्लाचे टोसीलीझुमाब इंजेक्शन मिळत नाहि.शासनाने ङोळ्यावरून पट्टी काढून खरि परिस्थिती पाहवी यासाठी आमरण उपोषणाची वेळ आल्याचे मनोज कळमकर यानी सांगितले






Be First to Comment