सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
उरण समालोचक असोशिएशन् अध्यक्ष पदी उरण मधील प्रसिद्ध मराठी समालोचक प्रसाद पांडुरंग भोईर दादरपाडा-उरण यांची निवड करण्यात आली आहे.
उरण समालोचक असोसिएशन ची स्थापना ही समालोचक,गुणलेखक, व अपडेटर्स यांना हक्काच व्यासपीठ मिळावं तसेच वरील सर्वांना व्यवसाईक स्वरुप मिळावं म्हणून स्थापन झाली आहे.असोसिएशनच्या सर्व सभासद आपल्याला मिळालेल्या मानधनातुन (समलोचण,गुणलेखन,अपडेटर) 10%टक्के रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी वापरतात. त्या अनुषंगाने इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनींचा वार्षिक खर्च असोसिएशनने तर्फे उचलला जातो.
आज पर्यंत चार वर्षात तब्बल 16 विद्यार्थ्यांनींना प्रत्येकी 10,000/–रु मदत करुन असोसिएशन ने सामाजिक बांधिलकी जपली आहे.सामाजिक बांधिलकी जपली गेली म्हणून समाजातील अनेक संघटनेच्या वतीने या असोसिएशनचे विशेष कौतुक केलं जातं आहे.व पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केलं गेले आहे.अश्या ह्या सामाजिक बांधिलकी जपणा-या उरण समालोचक असोसिएशनचे पदाधिकारी
1) प्रसाद पाडुरंग भोईर (अध्यक्ष)
2) जगदिश आत्माराम ठाकुर (उपाध्यक्ष)
3) प्रकाश ठाकुर (सचिव)
4) जयदास दामोदर ठाकुर व प्रल्हाद कासुकर (संयुक्त पणे खजिनदार 1/1 वर्ष )
5) आत्माराम नामदेव म्हात्रे (सल्लागार)
हे सर्व पदाधिकारी सामाजिक बांधिलकी जपत उरण समालोचक असोसिएशनचे कामकाज पाहत आहेत.
उरण समालोचक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चारित्र्य संपन्न, उत्तम युवा नेतृत्व असलेल्या प्रसाद पांडुरंग भोईर यांची निवड झाल्याने विविध सामाजिक संस्था, क्रिकेट रसिक प्रेमी,चाहते वर्गातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment