Press "Enter" to skip to content

भेंडखळ येथे कॅन्सर अवेअरनेस सेमिनार संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

उरण भागातील महिलांमध्ये कॅन्सर या आजाराच वाढत प्रमाण लक्षात घेतां आपण युवक संघटना भेंडखळ व वास्कर फाऊंडेशन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कॅन्सर अवेयरनेस सेमिनार चे आयोजन प्राथमि आरोग्य केंद्र भेंडखळ येथे करण्यात आले होते.

भेंडखळ गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकूर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी आयोजित या उपयुक्त अशा या कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांना कॅन्सर विषयी माहिती व उपाययोजना सांगण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वास्कर फाऊंडेशन पनवेल तर्फे प्रिया सावळे,हर्षाली गायकवाड,निलेश ठाकूर,दिपेश वास्कर व निखील तनपुरे, ग्रामपंचायत भेंडखळ च्या सदस्या सौ.संध्या ठाकूर,सौ.निता ठाकूर, सौ.स्वाती घरत तर युवक संघटनेतर्फे अनिल ठाकूर,परशुराम भोईर,मनोज भगत,चंद्रविलास घरत,लिलेश्वर ठाकूर,प्रांजल भोईर,संदिप म्हात्रे,अमेश ठाकूर,जन्मेजय भोईर,रूण्मय ठाकूर,मनोज पाटील,भावनेश ठाकूर,यतीश घरत उपस्थित होते. जरी मरी महिला बचत गट तसेच ईतरही महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.