Press "Enter" to skip to content

चाईल्ड केअर संस्थेच्या वतीने वेश्वी वाडीत धान्य, शैक्षणीक साहित्य,खाऊ वाटप

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

दिनांक १ डिसेंबर उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीतील गरजु कुटुंबियांना उरण येथील चाईल्ड केअर सामाजिक संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरिब व गरजुंना धान्य वाटप करण्यात आले. तसेच तेथील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप आणी आदिवासी वाडीतील लोकांना धान्य वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष विकास कडू मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या सेवाभावी कार्याबद्दल वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र मुंबईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला. यावेळी सरपंचानी मनोगत व्यक्त करुन संस्थेचे आभार मानुन कडु यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी रायगड भुषण मनोज पाटील ,मुख्याध्यापक रमणीक म्हात्रे, सौ. आशाताई कातकरी, ज्योती कातकरी, प्रतिभाताई पाटील, रंजना कातकरी, आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे किरण मढवी, गणेश मढवी, ऋतिक पाटील, अमोल डेरे, आदित्य पारवे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.