सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
स्वातंत्र्य पूर्वकाळात मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपले रक्त सांडवून इतिहास रचणारे माथेरानचे वीर सुपुत्र हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांची १०८ वी जयंती दि.१ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.
माथेरानच्या उत्तम प्रशासक कार्यकुशल नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या शुभ हस्ते हुतात्मा स्मारका मधील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अज्ञात हुतात्म्यांच्या नामफलकास मेघा गणेश कोतवाल यांनी पुष्पहार अर्पण केला. मशाल प्रज्वलित करून मशाल मिरवणूक नौरोजी उद्यानात मुख्य मार्गाने नेण्यात आली. भाई कोतवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला उप नगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर नौरोजी उद्यानातील भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला हुतात्मा भाई कोतवाल ब्रिगेडचे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास जेष्ठ समाजसेविका अश्वपाल संघटना अध्यक्षा आशा कदम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उपस्थितांनी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी काही नगरसेवक ,नगरसेविका आजी माजी पदाधिकारी,महिला आघाडीच्या संगीता जांभळे, समिना महापुळे,प्रीती कळंबे, अंगणवाडी सेविका मनीषा शिंदे तसेच नगरपरिषद कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, विविध संस्थांचे पदाधिकारी,वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष योगेश जाधव, प्रकाश सुतार, चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे, भाजपचे अध्यक्ष विलास पाटील,आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment