सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
आज दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी रायगड जिल्हा परिषद केंद्र वैजनाथ येथे भाई कोतवाल जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमात मान्यवरांच्या व केंद्रातील आदर्श शिक्षिका माननीय सौ बोराडे मॅडम,श्रीमती औटी मॅडम,सौ उपासनी मॅडम यांच्या शुभहस्ते वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
केंद्रात 1 डिसेंबर 2014 रोजी केंद्रप्रमुख मा. श्री नारायण सोनवणे यांनी स्थापन केलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल केंद्रीय गुणवत्ता कक्षाची माहिती आणि या कक्षाच्या माध्यमातून शाळांचा झालेला गुणवत्ता व भौतिक विकासाची परिपूर्ण माहिती आपल्या प्रस्तावनेत केंद्राचे तंत्रस्नेही शिक्षक श्री धनाजी देसले यांनी दिली.
“”वीर हुतात्मा भाई कोतवाल.. केंद्रीय गुणवत्ता कक्षाची यशोगाथा…पुस्तिका “”रायगडभूषण केंद्रप्रमुख श्री नारायण भिकू सोनवणे ,केंद्रातील आदर्श शिक्षिका व उपस्थित सर्व उपक्रमशील शिक्षक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. केंद्रात स्थापन केलेल्या” वीर हुतात्मा भाई कोतवाल कला पथक केंद्र वैजनाथ “यांच्या माध्यमातून केंद्राचे शाहीर मा. श्री कृष्णा उंबरे व मा. श्री सागर सांगळे सर यांनी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रेरणादायी गीते सादर केली.
केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री नारायण सोनवणे यांनी दोन्ही हुतात्मा यांच्या बलिदान गाथा सांगितली.शेवटी केंद्रात भाई कोतवाल यांची प्रेरणा घेवून जी जी शैक्षणिक नवोपक्रम व उल्लेखनीय उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले त्यामागे “वीर हुतात्मा भाई कोतवाल केंद्रीय गुणवत्ता कक्षाचे “योगदान असल्याबद्दल सक्रिय सर्व शिक्षक व शाळांचे आभार मानले.त्यांना धन्यवाद दिले.
शेवटी श्री धनाजी देसले सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.या हस्त पुस्तिकेसाठी केंद्रातील सर्व उपक्रमशील शिक्षक व भालीवडी आश्रम शाळा शिक्षक श्री बाबासाहेब ढाकणे, नरेंद्र साळुंके,अशोक पाखरे,संजय ड फळ,विलास बुरुड,संतोष घोडविंडे, नितीन थोरात,संतोष देशमुख,विशाल हांडे सर, सविता बोराडे,अर्चना औटी, कल्पकता उपासनी,अर्चना शिंदे
उपस्थित होते.आश्रमशाळा भालीवडी येथील शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.
यांचे विशेष सहकार्य लाभले








Be First to Comment