Press "Enter" to skip to content

एन आय एन्स्टीटूशन हायस्कूल मध्ये एड्स मार्गदर्शन शिबिर


सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण ।

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे मायघर म्हणून प्रसिद्ध असलेले कै गो. ना अक्षीकर विद्या संकुळात एनआय एन्सिट्यूशन हायस्कूल मध्ये प्रतिवर्षी प्रमाणे कोरोना रोगाचा धोका लक्षात घेऊन या वर्षी १डिसेंबर रोजी जन जागृती रेली न काढता शाळेत उपस्थित असलेल्यासाठी १ डिसेंबर २०२० एड्स औचित्य साधून मार्गदर्शन शिबिर आयोजित करून हायस्कूलने आपली वर्षाची परंपरा जपली.

या प्रसंगी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उरण इंदिरा ग्रामीण रूग्णालयाचे डॉ महादेव पवार मेडिकल असोशीयनचे व ॐसाई मेडिकलचे मालक मनोज ठाकुर, एन आय हायस्कूलचे मुख्यध्यापक भोये सर,एस एस पाटील सर,पत्रकार रमेश थळी,विद्यार्थिनी. विद्यार्थी पालक उपस्थित होते.

हा कार्यक्रम खबरदारी म्हणून शासकीय नियम पाळून वर्गात एका बँचवर एक विद्यार्थी माक्स लावून सुरक्षित अंतर पाळून साजरा करण्यात आला.या प्रसंगी डॉ महादेव पवार,यांनी एड्स विषयी माहिती देताना एड्स चा फैलाव व या रोगाविषयी सावधगिरी कशी बालगावी हे सविस्तर पटटून दिले मनोज ठाकुर यांनी मार्गदर्शन करताना इंटरनेटचा वापर आपले करीयर व अभ्यासासाठी कसा करावा हे समजावून सांगीतले भोये सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले एस एस पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने परिश्रम घेतले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.