Press "Enter" to skip to content

वेश्वी आदिवासी वाडीत एड्स जनजागृती मार्गदर्शन शिबीर संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

मंगळवार दिनांक १ डिसेंबर जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त नेहरु युवा केंद्र अलिबाग ( भारत सरकार ) आणि महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. संगिता मच्छिद्र ठाकूर फांऊडेशन धुतुम ,युवा संघ रावे, चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती मार्गदर्शन शिबीर उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीत यशस्वीपणे संपन्न झाला.

एड्स या रोगाबाबत रायगड भुषण मनोज पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन सावध तो सुखी अशी गुरूकिल्ली यानिमित्ताने बहाल केली.

जगभर फैलावलेल्या या जीवघेण्या एड्स ( HIV ) रोगाबाबत समज – गैरसमज दुर करण्यासाठीच, लोकांना योग्य मार्गदर्शन व समाजात जणजागृती व्हावी म्हणुन १ डिसेंबर हा जागतिक एड्स जनजागृती दिवस साजरा करावे म्हणुन जागतिक राष्ट्रसंघाने जाहिर करण्यात आलेले आहे.

या शिबीरासाठी प्रमुख उपस्थिती वेश्वीचे ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र मुंबईकर, मुख्याध्यापक रमणीक म्हात्रे, चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे अध्यक्षविकास कडु, कार्याध्यक्ष विक्रांत कडू आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे किरण मढवी, गणेश मढवी, आशाताई कातकरी, ज्योती कातकरी, प्रतिभाताई पाटील, रंजना कातकरी, ऋतिक पाटील,अमोल डेरे, आदित्य पारवे, ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.