Press "Enter" to skip to content

उरण तालुका स्तरीय दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या तसेच आपली बोलीभाषा, संस्कृती आणि समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काम करत असलेल्या आ.को.क.सं. सामाजिक संस्थेतर्फे आयोजित दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठया उत्साहात संपन्न झाले .

स्पर्धेतील विजेते उमेदवार कु. पार्थिव प्रकाश पाटील – पिरकोन (प्रथम क्रमांक), कु. माऊली महेश पाटील – खोपटे (द्वितीय क्रमांक), कु. अनुज गुरुनाथ पाटिल – कुंडेगाव (तृतीय क्रमांक), कु. निसर्ग मच्छिन्द्रनाथ म्हात्रे – वशेणी (उत्तेजनार्थ) यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना संघटक- बी एन डाकी, शिवसेना पदाधिकारी कैलास म्हात्रे, भावना म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते गणेश मंदिर, खोपटे -उरण येथे प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरणाच्या वेळी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका कार्याध्यक्ष चेतन गावंड, उरण शहर विभागाध्यक्ष रवींद्र भोईर, सदस्य चंद्रशेखर भोमकर, प्रांजळ पाटील, भूपेंद्र पाटील, अरुण म्हात्रे, विठ्ठल ममताबादे तसेच स्पर्धाकांचे पालक आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

अवघ्या महाराष्ट्र राज्यात विभागानुसार राबवल्या गेलेल्या या स्पर्धांना उत्तम,उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्यांमधील गड प्रेम आणि इतिहाबद्दलची आवड आणि आस्था त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. समाजातील अनेक घटकांकडून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांच्या पाठीवर शाब्बाशीची थाप देखील पडली सोबत पुढील वर्षी देखील सहभाग घेण्याचे आश्वासन स्पर्धकांकडून मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.