सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सभा शिक्षक पतपेढी कार्यलय रोहा येथे संपन्न झाली.या सभेत अजय अविनाश कापसे यांची चिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पतपेढीचे संचालक रमेश जांभळे,किशोर जाधव,चंद्रकांत वरखळे,संदीप जामकर,संतोष यादव,जयेश भोईर,संतोष खलापकर, प्रदीप खाडे,कुसळकर,निवेदिता नाईक,संध्या दिवेकर, व संस्थेचे कर्मचारी राजेश शेलार,कु.प्रीती उपस्थित होते.
अजय कापसे हे सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,कला प्रकारात,संघटनात्म चळवळीत,सहकार क्षेत्रात अभ्यासपूर्ण भरीव कामगिरी,व रोहा तालुका कुणबी समाजात सक्रिय असणारे व्यक्तीमत्व आहेत.अजय कापसे यांची प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चिटणीस पदी निवड होताच सर्व उपस्थितांनी तसेच खांब कुणबी ग्रुप व रोहा कुणबी ग्रुपवरील सर्व कुणबी बांधव यांनी अभिनंदन केले आहे.






Be First to Comment