Press "Enter" to skip to content

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास मनसेचा पाठिंबा

मागण्या मान्य न झाल्यास मनसे काय चीज आहे हे रिलायन्स प्रशासनाला दाखवून देऊ : गोवर्धनभाई पोलसानी

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांनी कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य न झाल्याने मंगळवारी पाचव्या दिवशीही आपले आंदोलन कायम ठेवले आहे. या संदर्भात मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांनी मंगळवारी (दि. १) सकाळी ११ वाजता कडसुरे येथील कंपनीच्या मटेरियल गेट समोर बसलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास मनसेचा सक्रिय पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच कंपनी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या रास्त मागण्या येत्या २४ तासात मान्य केल्याच पाहिजे अन्यथा मनसे काय चीज आहे हे कंपनी प्रशासनाला दाखवून देऊ असा इशाराही यावेळी गोवर्धनभाई पोलसानी यांनी दिला.

आंदोलनकर्त्यांना संबोधताना मनसे नेते गोवर्धन पोलसानी म्हणाले की, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या परवानगीने व मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचा आपणास पाठिंबा जाहीर केला असून मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे राजकारण करायला व श्रेय घेयायला आलेलो नाही कारण तुमच्या प्रश्नाची मला जाणीव आहे. सन १९८० – ९० च्या दरम्यान याच कडसुरे मटेरियल गेटवर फार मोठे आंदोलन झाले होते. आंदोलनकर्ते व आम्ही कंपनीचे सर्व गेट बंद करून नाकाबंदी केली होती त्यावेळेस मी शिवसेनेत होतो. त्यावेळी माझ्यावर व सहका-यांवर केसेस देखील झाल्या होत्या.

गोवर्धनभाई पोलसानी पुढे म्हणाले की, या ठिकाणी माझ्या माय बहिणी व बांधव गेले चार दिवस उन्हातान्हात थंडीत बसलेले आहेत. तरी सुद्धा या मुजोर रिलायन्स प्रशासनाला दया माया पण येत नाही. आम्हाला नको भीक, नको मेहेरबानी, आलोय आमच्या हक्काला… हाकला या हुजऱ्यांना असे शेवटी गोवर्धनभाई पोलसानी म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.