सावधान… तुमची मुलं लिफ्ट मध्ये खेळत आहेत का ? मग पहा हा व्हिडिओ 🔷🔷🔶🔶
https://youtu.be/mfp1Dw9uQR8
सिटी बेल लाइव्ह । मुंबई । 🔶🔷🔶🔷
लिफ्टमध्ये अडकून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मुंबईतल्या धारावी क्रॉस मार्गावरील शाहूनगर परिसरात घडली. या प्रकरणी अपमृत्यूची नाेंद करण्यात असल्याचे शाहूनगर पोलिसांनी सांगितले. सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, शाहू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालवाडी, धारावी क्रॉस रोड या ठिकाणी कोझी शेल्टर नावाची ७ मजली इमारत आहे.
चौथ्या मजल्यावरील रूम नं ४०२ मध्ये राहणारा मुलगा नामे मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख (वय ५ वर्ष) हा दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास ७ वर्षांची मोठी बहीण व 3 वर्षांच्या लहान बहिणीसोबत ग्राउंड फ्लोअरवरून 4 थ्या मजल्यावरील राहत्या घरी जात होते. चौथ्या मजल्यावर लिफ्ट आल्यावर दोन्ही बहिणी लिफ्टचे स्लायडिंग लोखंडी ग्रील सरकवून बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून लिफ्टच्या बाहेर गेल्या. त्यावेळी त्यानंतर मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा लिफ्टच्या बाहेर येताना लिफ्टचे लोखंडी ग्रील बंद करत असताना त्याला बाहेर येता आले नाही अन् त्याचवेळी समोरील लाकडी सेफ्टी दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट सुरू झाली. लिफ्टच्या लोखंडी ग्रील व लाकडी दरवाज्यामध्ये अडकून लिफ्टवर गेल्यामुळे लिफ्टच्या खालील मोकळ्या जागेत मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती प्राप्त होताच शाहूनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयास्पद काहीच आढळून आले नाही. या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात 139/2020 नुसार अपमृत्यूची नाेंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सावंत करत आहेत.
या दुर्घटनेच्या निमित्ताने इमारतीमधील रहिवाशांनी लिफ्टमध्ये लहान मुलांना एकटे पाठवू नका. लिफ्टमनशिवाय लिफ्टमध्ये प्रवेश करू देऊ नका, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी नागरिकांना केले आहे.








Be First to Comment