Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेत रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा धनादेश सुपूर्द

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔷🔶

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये रमाई आवास योजनेच्या आठ लाभार्थ्यांना घरकुल साठी पहिला हप्ता देण्यात आला आहे

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर्फे नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजने अंतर्गत सुधारित घरकुल योजनेस शासनाने मान्यता दिली आहे, त्यानुसार कर्जत नगर परिषदेने याबाबत प्रस्ताव मागितले होते. कर्जत नगरपरिषद क्षेत्रात नऊ प्रस्ताव नगर परिषदेकडे प्राप्त झाले होते, त्यापैकी कागदांची पूर्तता झालेले आठ प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यात आठ लाभार्थींना पहिला हप्ता म्हणून 1 लाख 25 हजार रुपयाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला, दुसरा 1 लाख 25 हजार रुपयांचा हप्ता घरकुल पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे.

लाभार्थींना धनादेश सुपूर्द करताना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे, नगरससेवक राहुल डाळींबकर, विवेक दांडेकर नगर अभियंता मनिष गायकवाड, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.