Press "Enter" to skip to content

डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्याहस्ते तात्यासाहेब म्हस्कर यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔷🔶

मोहोपाडा येथील सिताराम उर्फ तात्यासाहेब उंद-या म्हसकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त प.पू.डाॅ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

जीवन कला मंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागातील जीवन कला मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची सभा आयोजित केली होती. प्रथम जीवन कला मंडळ रसायनी कार्याध्यक्ष पूर्णवादरत्न लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराज बाग पारनेर येथे सभा झाली. नंतर संध्याकाळी सहा वाजता परमपूज्य डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

माणसाने आपले जीवन जगताना तळागाळातील व्यक्तीचा विचार करणे गरजेचे आहे, आपण समाधानी झालो इतर कसे समाधानी होतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.कै. दादासाहेब सोनवणे यांनी पूर्णवादासाठी तन-मन-धन अर्पण केले,आपण सर्वांनी त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

जीवन ही कला आहे आणि नीती म्हणजे माणूस याला अनुसरून अखिल मानवजातीचा विकास पूर्ण वादातून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी ग्राम सुधार मंडळाचे सचिव व महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त प. पू.डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास पूर्णवाद गुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष गुनेशदादा पारनेरकर , जीवन कला मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, रसायनी येथील जीवन कला मंडळाचे अध्यक्ष तुलसीदास पाटील, सचिव अनंता दळवी, कोषाध्यक्ष डॉ.ए.आर.पाटील , सहसचिव अनंता भोईर , संदिप कार्ले , पनवेल, मुंबई, कल्याण, टिटवाळा, लोणावळा येथील जीवन कला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.